Monday, March 10, 2008

marathi kavita

आईकडे अश्रुंचे पाट असतात.
पण बापाकडे संयमाचे घाट असतात.
आई रडून मोकळी होते.
पण सांत्वन वडिलांनाचकरावं लागतं
आणि रडणा-यापेक्षा सांत्वनकरणा-यावरच जास्त ताण पडतो
कारण ज्योतीपेक्षा समईचजास्त तापते ना!
पण श्रेयनेहमी ज्योतीलाच मिळतराहतं!
रोजच्या जेवणाची सोयकरणारी आई आमच्या लक्षात राहते
पण आयुष्याच्याशिदोरीची सोय करणारा
बाप आम्ही किती सहज विसरून जातो

No comments: